Nehemiah 5:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिवाय, यहुद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या त्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंदांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. माझ्या अन्नासाठी लोकांवर कर भरायची सक्त मी केली नाही अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंत मी अधिकारी होतो. मी यहुदाचा बारा वर्षे अधिकारी होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदा देशात मला त्यांचा अधिपती नेमले तेव्हापासून म्हणजे अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंत बारा वर्षे मी व माझे भाऊबंद ह्यांनी माझ्या अधिपतीच्या वेतनाचे अन्न खाल्ले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याशिवाय, अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंतच्या—बारा वर्षांच्या संपूर्ण कालावधीत मी यहूदीयाचा राज्यपाल असताना, माझ्या बंधूंनी आणि मी राज्यपालास नेमून दिलेल्या अन्नाचा वाटा घेतला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिवाय, यहूद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंदांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंत मी अधिकारी होतो. मी यहूदाचा बारा वर्षे अधिकारी होतो.