Nehemiah 5:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेमची तटबंदी उभारायला मी कष्ट घेतले. भिंतीचे काम करायला माझी सर्व माणसे एकत्र आली. आम्ही कोणाची जमीन बळकावली नाही!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मी कोटाचे काम नेटाने चालवले; आमच्या लोकांनी काही जमीन विकत घेतली नाही; माझे सर्व सेवक कामासाठी तेथे एकत्र झाले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याउलट मी सर्व शक्तिनिशी तटाच्या कामास समर्पित राहिलो. माझे सेवकही एकत्र येऊन कामास लागले. आम्ही कोणत्याही जमिनीची खरेदी केली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मीसुद्धा तटबंदीच्या कामात सतत होतो आणि आम्ही जमीन विकत घेतली नाही. आणि माझे सर्व सेवक काम करण्यासाठी एकत्र आलो.