Nehemiah 6:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुढे, आम्ही भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी ऐकले. भिंतीतली भगदाडे आम्ही बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी कोट बांधण्याचे संपवले आणि कोटाला कोठे तुटफूट राहू दिली नाही. वेशीचे दरवाजे मात्र अद्यापि लावले नव्हते; हे सनबल्लट, तोबीया, गेशेम अरबी व आमचे वरकड शत्रू ह्यांनी ऐकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सनबल्लट, तोबीयाह, गेशेम अरबी आणि आमच्या इतर शत्रूंना समजले की मी तट बांधण्याचे काम अंदाजे पूर्ण केले आहे व एकही भेग बाकी राहिली नाही—खरेतर वेशींना दरवाजे लावण्याचेच काम राहिलेले होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता जेव्हा मी भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी असे ऐकले की, भिंतीतली भगदाडे मी बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते,