Nehemiah 6:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी एकदा दलायाचा मुलगा शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेतबेलचा मुलगा. शमायाला आपल्या घरीच थांबून राहावे लागले होते. तो म्हणाला, “नहेम्या, आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करु, कारण लोक तुला मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला मारायला येतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मी शमाया बिन दलाया बिन महेटाबेल ह्याच्या घरी आलो. तो दार लावून घेऊन आत बसला होता; त्याने म्हटले, “चल, आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभार्यात जमून मंदिराची दारे बंद करून घेऊ; कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील; ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक दिवस मी महेटाबेलाचा पुत्र दलायाहचा पुत्र शमायाह याच्या घरी गेलो, जो त्याच्या घराबाहेर पडत नसे. तो म्हणाला, “आपण परमेश्वराच्या भवनात भेटू या, मंदिराची दारे व कड्या लावून घेऊ, कारण तुला ठार मारण्यास माणसे येत आहेत—आज रात्री ते तुला ठार करण्यासाठी येतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी एकदा दलायाचा पुत्र शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेतबेलचा पुत्र. शमायाला आपल्या घरीच थांबून रहावे लागले होते. तो म्हणाला “आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करु, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला ठार मारायला येतील.”