Nehemiah 6:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहुदातील बऱ्याच लोकांनी त्याच्याशी प्रामाणिक राहायचे त्याला वचन दिले होते म्हणून ते ही पत्रे पाठवत होते. कारण, आरहाचा मुलगा शखन्या याचा तोबीया जावई होता. आणि तोबीयाचा मुलगा योहानान याचे मशुल्लामच्या मुलीशी लग्र झाले होते. मशुल्लाम हा बरेख्याचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो शखन्या बिन आरह ह्याचा जावई होता आणि त्याचा पुत्र योहानान ह्याने बरेख्याचा पुत्र मशुल्लाम ह्याच्या कन्येशी लग्न केले होते, म्हणून यहूदातल्या पुष्कळ लोकांनी त्याच्या बाजूने राहण्याची आणभाक केली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयातील पुष्कळ लोकांनी तोबीयाहाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेली होती, कारण तोबीयाहचा सासरा, आरहाचा पुत्र शखन्याह होता आणि तोबीयाहचा पुत्र यहोहानान याने बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम याच्या कन्येशी विवाह केला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदातील बऱ्याच लोकांनी त्याच्याशी प्रामाणिक राहायचे त्यास वचन दिले होते. कारण, आरहाचा पुत्र शखन्या याचा तोबीया हा जावई होता. तोबीयाचा पुत्र योहानान याचे मशुल्लामच्या कन्येशी लग्र झाले होते. मशुल्लाम हा बरेख्याचा पुत्र.