Nehemiah 6:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत पुढीलप्रमाणे निरोप पाठवला: “एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हाला भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पाहून मी जासूद पाठवून त्यांना कळवले की, “मी मोठ्या कामात गुंतलो आहे; मला यायला सवड नाही; मी काम सोडून तुमच्याकडे का यावे, काम का बंद पाडावे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी त्यांच्याकडे उलट हा निरोप पाठविला: “मी एक महान कार्य करीत आहे; ते कार्य थांबवून मी तुमच्या भेटीला का यावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की, “एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हास भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही.”