Nehemiah 7:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा सर्व लोकांनी एकदा एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात आणले. सर्व वंशावळयांची यादी करावी म्हणून मी सर्व महत्वाची माणसे, अधिकारी, सामान्य लोक यांना एकत्र बोलावले. बंदिवासातून जे सगळयात आधी परत आले त्यांच्या वंशवळ्यांच्या याद्या मला सापडल्या त्यात मला जे लिहिलेले सापडले ते पुढीलप्रमाणे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरदार, शास्ते व इतर लोक जमा करून त्यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी असे माझ्या देवाने माझ्या मनात घातले. जे प्रथम यरुशलेमेत आले होते त्यांच्या वंशावळीची वही मला सापडली व तिच्यात हे लिहिलेले सापडले:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर माझ्या परमेश्वराने शहराच्या सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व सामान्य नागरिकांना एकत्र करून वंशावळ्यांप्रमाणे त्यांची नोंदणी करावी असे विचार माझ्या मनात घातले. जे सर्वप्रथम परतले त्यांच्या वंशावळ्याची नावनिशी मला सापडली. तिच्यात असे लिहिले होते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या देवाने सरदार, अधिकारी आणि लोक यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी म्हणून एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात घातले. जे पहिल्याने वर आले त्यांच्या वंशावळयांची नावनिशी मला सापडली, आणि त्यामध्ये जे लिहिले होते ते हे.