Nehemiah 8:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या वर्षीच्या सातव्या महिन्यात सर्व इस्राएल लोक एकत्र आले. त्यांच्यामध्ये इतकी एकजूट होती की ते एकमेकांशी अगदी तद्रूप झाले होते. पाणी वेशीच्या समोरच्या मोकळया जागेत ते जमले. त्या सर्वांनी शिक्षक एज्राला मोशेच्या नियमशास्त्राचे पुस्तक बाहेर काढायला सांगितले. परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले ते नियमशास्त्र हेच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशीजवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री ह्याला म्हणाले, “परमेश्वराने इस्राएल लोकांना विहित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता सर्व लोक जल वेशीसमोरील चौकात एकत्र जमले. आणि त्यांनी नियम शिकविणारा शिक्षक एज्राला विनंती केली की याहवेहने इस्राएली लोकांना दिलेले मोशेचे नियमशास्त्र त्याने बाहेर आणून सर्वांना वाचून दाखवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व इस्राएल लोक पाणीवेशीच्या समोरच्या मोकळया जागेत एकत्र जमले. त्या सर्वांनी शास्त्री एज्राला परमेश्वराने इस्राएल लोकांस दिलेले मोशेचे नियमशास्त्राचे पुस्तक आणावयास सांगितले.