Nehemiah 8:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बंदिवासातून परत आलेल्या सर्वच्या सर्व इस्राएल लोकांनी असे मांडव घातले. त्यात ते राहिले. नूनचा मुलगा यहोशवा याच्या काळापासून ते आजतागायत इस्राएलींनी हा मंडपाचा सण अशाप्रकारे साजरा केला नव्हता. सर्वांना अतिशय आनंद झाला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे लोक बंदिवासातून सुटून परत आले होते त्यांचा अवघा मेळा मांडव घालून त्यांत राहिला; नूनाचा पुत्र येशूवा ह्याच्या काळापासून ह्या दिवसापर्यंत इस्राएल लोकांनी कधी असे केले नव्हते. चोहोकडे आनंदच आनंद झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या मांडवामध्ये बंदिवासातून परत आलेले सर्वजण सणाचे सात दिवस राहिले. नूनाचा पुत्र येशूआ याच्या काळापासून हा सण इस्राएली लोकांनी अशा प्रकारे साजरा केलेला नव्हता. प्रत्येकाचा आनंद खूप मोठा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बंदिवासातून परत आलेल्या सर्वांनी मांडव उभारले व त्यामध्ये ते राहिले. नूनचा पुत्र येशूवा याच्या काळापासून ते त्या काळापर्यंत इस्राएलींनी हा मंडपाचा सण साजरा केला नव्हता. सर्वांना अतिशय आनंद झाला होता.