Nehemiah 8:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या सणाच्या काळात एज्राने त्यांना रोज नियमशास्त्र वाचून दाखवले. सणाच्या पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत एज्राने हे पठण केले. इस्राएलींनी सात दिवस हा सण साजरा केला. नियमशास्त्राला अनुसरुन आठव्या दिवशी ते सर्वजण खास सभेसाठी एकत्र जमले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ नित्य वाची. ह्या प्रकारे त्यांनी सात दिवसांपर्यंत सण पाळला आणि आठव्या दिवशी विधीपूर्वक सणाचा समारोप केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सणाच्या या दिवसांच्या काळात, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा परमेश्वराच्या नियमशास्त्राचे वाचन करीत असे. सात दिवस सण साजरा केल्यानंतर आठव्या दिवशी मोशेच्या नियमशास्त्राला अनुसरून महासभा घेण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रतिदिवशीही, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचीत होता. त्यांनी सात दिवस हा सण साजरा केला आणि नियमानुसार विधीपूर्वक आठव्या दिवशी सभा भरून पाळला.