Nehemiah 9:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सर्व इस्राएल लोक उपवासासाठी एकत्र जमले. आपल्याला शोक झाला आहे हे सूचित करणारे कपडे त्यांनी घातले होते. तसेच आपली विमनस्कता दाखवण्यासाठी त्यांनी केसात राख घालून घेतली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इस्राएल लोक उपास करून गोणपाट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकत्र झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याच महिन्याच्या चोवीस तारखेला, इस्राएली एकत्र आले. यावेळी त्यांनी उपास केला व गोणपाट पांघरूण त्यांनी आपल्या डोक्यावर धूळ घातली
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता त्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सर्व इस्राएल लोक उपवासासाठी गोणपाट घालून व डोक्यांत धूळ घालून एकत्र जमले.