Nehemiah 9:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मूळ इस्राएली लोक परकी लोकांमध्ये न मिसळता वेगळा गट करून उभे होते. इस्राएलींनी मंदिरात उभे राहून आपल्या तसेच आपल्या पूर्वजांच्या पापांची कबुली दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल वंशातील लोक विदेश्यांपासून निराळे झाले, आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या इस्राएली वंशजांनी स्वतःला सर्व गैरयहूद्यांपासून वेगळे ठेवले, ते आपआपल्या जागेवर उभे राहिले व त्यांनी स्वतःची आणि आपल्या पूर्वजांची पापे कबूल केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएली वंशजांनी स्वतःला परकीयांपासून वेगळे केले. ते उभे राहिले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या पापांची आणि आपल्या पूर्वजांच्या वाईट कृत्यांची कबुली दिली.