Nehemiah 9:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे परमेश्वरा, त्यांना तू राज्ये आणि राष्टे दिलीस. फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस. हेशबोनच्या राजाचा म्हणजे सिहोनचा प्रांत त्यांना मिळाला. बाशानचा राजा ओग याचा भूभाग त्यांना मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तू त्यांना देशोदेशीचे लोक अंकित करून दिले आणि त्यांच्या चतुःसीमा नेमून दिल्या, त्याप्रमाणेच हेशबोनचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्या दोघांच्या देशांचे वतन त्यांना प्राप्त झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नंतर राज्ये व राष्ट्रे तुम्ही त्यांना दिली आणि दूरवरच्या कानाकोपर्‍यातील सरहद्दीही दिल्या. त्यांनी हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओगचे देश काबीज केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना तू राज्ये आणि लोक दिलेस. फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस. हेशबोनचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग या दोघांच्या देशाचे वतन त्यांना ताब्यात मिळाले.