Nehemiah 9:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून तू त्यांना शत्रूच्या ताब्यात जाऊ दिलेस. शत्रूने त्यांना फार हैराण केले. अडचणीत सापडल्यावर आमच्या पूर्वजांनी मदतीसाठी तुला आवाहन केले आणि स्वर्गातून तू त्यांचा धावा ऐकलास. तू फार कनवाळू आहेस. म्हणून त्यांच्या रक्षणार्थ तू लोकांना पाठवलेस. आणि या लोकांनी त्यांची शत्रू पासून सुटका केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यामुळे तू त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले; त्यांनी त्यांना संकटात घातले; तरी आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला; तो तू स्वर्गातून ऐकलास व तुझ्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडवण्यासाठी तू त्यांना सोडवणारे दिलेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून तुम्ही त्यांना शत्रूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांचा छळ केला. पण जेव्हा त्यांचा छळ होऊ लागला, त्यावेळी त्यांनी तुमचा धावा केला. तो तुम्ही स्वर्गातून ऐकला. त्यांच्यावर महान कृपा करून, शत्रूपासून मुक्त करणारे रक्षक त्यांच्याकडे पाठविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तू त्यांना शत्रूच्या ताब्यात दिलेस. शत्रूने त्यांना फार हैराण केले. अडचणीत सापडल्यावर आमच्या पूर्वजांनी मदतीसाठी तुझा धावा केला आणि स्वर्गातून तू त्यांचा धावा ऐकलास. तू फार कनवाळू आहेस. म्हणून त्यांची शत्रूपासून सुटका केलीस.