Nehemiah 9:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग निवांतपणा लाभल्यावर आमच्या पूर्वजांनी पुन्हा ती दुष्कृत्ये करायला सुरुवात केली. तेव्हा तू शत्रू कडून त्यांचा पाडाव करवलास आणि शासन करवलेस. त्यांनी मदतीसाठी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकलास आणि त्यांच्या मदतीला गेलास किती बरे तू कनवाळू आहेस! असे अनेकदा घडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण जेव्हा जेव्हा त्यांना स्वास्थ्य मिळे तेव्हा तेव्हा ते तुझ्यासमोर दुष्कर्म करीत; ह्यामुळे तू त्यांना शत्रूंच्या हाती दिलेस व त्यांनी त्यांच्यावर सत्ता केली; तरी त्यांनी तुझ्याकडे वळून तुझा धावा केला, तो तू स्वर्गातून ऐकला आणि तुझ्या दयेच्या कृत्यांना अनुसरून तू त्यांना अनेक वेळा मुक्त केलेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पण सर्व सुरळीत झाले की, ते परत तुमच्या नजरेत पाप करू लागले. मग तुम्ही त्यांना नाकारून, त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, जे त्यांच्यावर शासन करीत. आणि जेव्हा ते परत तुमचा धावा करीत, तेव्हा तुम्ही तो स्वर्गातून ऐकून तुमच्या करुणेने त्यांना वेळोवेळी सोडवित असत!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग निवांतपणा लाभल्यावर आमच्या पूर्वजांनी पुन्हा ती दुष्कृत्ये करायला सुरुवात केली. तेव्हा तू शत्रूकडून त्यांचा पाडाव करवलास आणि शासन करवलेस. त्यांनी मदतीसाठी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकलास आणि तुझ्या दयेस्तव अनेकदा त्यांना सोडवलेस.