Nehemiah 9:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तीन तास तिथे उभे राहून त्यांनी परमेश्वर देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथाचे वाचन केले. पुढे आणखी तीन तास त्यांनी आपल्या पातकांचे कबुलीजबाब दिले आणि खाली वाकून परमेश्वराची उपासना केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आपल्या जागी उभे राहून दिवसाच्या एक प्रहरभर (तीन तास) आपला देव परमेश्वर ह्याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत राहिले, व आणखी एक प्रहर आपली पातके कबूल करत आणि आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करत राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते उभे असताना याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ त्यांना तीन तास मोठ्याने वाचून दाखविण्यात आला. त्यानंतरचे तीन तास पापांगिकार केला व याहवेह आपल्या परमेश्वराची भक्ती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आपल्या जागेवर उभे राहिले आणि आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचत राहिले. पुढे आणखी सहा तास त्यांनी आपल्या पातकांची कबुली दिली आणि आपला देव परमेश्वरापुढे नमन केले.