Nehemiah 9:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग पुढील हे लेवी पुन्हा बोलले: येशुवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथहग्र. ते म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन करा.” देवाचे अस्तित्व पहिल्यापासून आहे आणि परमेश्वर चिरकाल राहील. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत. तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या व पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला देव परमेश्वर ह्याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा: तुझे वैभवशाली नाम धन्य असो; ते सर्व धन्यवाद व स्तवन ह्यांपलीकडे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग लेवी—येशूआ, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीयाह, शबन्याह व पथह्याह—हे लोकांना म्हणाले: “उभे राहा आणि याहवेह तुमच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते अनादि काळापासून शाश्वत परमेश्वर आहेत.” “तुमचे वैभवी नाव धन्य असो आणि ते सर्व प्रशंसा व स्तवनाच्या उच्चस्थानी राहो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग येशूवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन सदासर्वकाळ करा. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत आणि तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो.