Nehemiah 9:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो तुझ्याशी प्रामाणिक आणि निष्ठावान आहे असे पाहून त्याच्याशी तू करार केलास. कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी आणि गिर्गाशी यांचा देश त्याला द्यायचे वचन दिलेस. अब्राहामाच्या वंशजांना हा भूभाग द्यायचे तू वचन दिलेस आणि तू ते पाळलेस. कारण, तू भला आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याचे अंत:करण तुझ्यासंबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केलास की मी तुझ्या वंशजांना कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशी ह्यांचा देश देईन; तू हे आपले वचन पुरे केले आहेस, कारण तू न्यायी आहेस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचे अंतःकरण तुमच्याशी विश्वासू आहे हे तुम्ही बघितले, म्हणून त्याच्या वंशजांना कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशीचा देश देण्याचा तुम्ही त्याच्याशी करार केला. तुम्ही वचन दिल्याप्रमाणे केले, कारण तुम्ही विश्वासयोग्य आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तुझ्याशी निष्ठावान आहे असे पाहून त्याच्याशी तू करार केलास की, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी आणि गिर्गाशी यांचा देश त्याच्या वंशजांना द्यायचे वचन दिलेस. आणि तू ते पाळलेस. कारण, तू न्यायी आहेस.