Numbers 1:50 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लेवी लोकांना सांग की आज्ञापटाच्या पवित्र निवास मंडपाबद्दल ते जबाबदार आहेत; पवित्र निवासमंडप व त्याबरोबर त्यातील सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी. पवित्रनिवास मंडप व त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे. त्यांनी आपले तंबू पवित्र निवास मंडपाभोवती ठोकावेत आणि त्याची निगा राखावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर साक्षपटाच्या निवासमंडपावर, त्यातील सर्व सामानावर व त्यासंबंधाचे जे काही असेल त्यावर लेव्यांना अधिकारी नेमून ठेव; निवासमंडप आणि त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे, त्यासंबंधीच त्यांनी सेवा करावी व आपले डेरे निवासमंडपाभोवती ठोकावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवी लोकांस सांग की साक्षपटाच्या निवासमंडपावर व त्याबरोबर त्यातील सर्व वस्तूंवर त्याचे जे आहे त्यावर त्यांना नेम. त्यांनी निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू वाहून न्याव्यात. त्यांनी आपले तंबू निवासमंडपाभोवती उभारावेत आणि त्याची निगा राखावी.