Numbers 11:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणिले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून तीन फूट वरपर्यंत थर साचला. माणूस एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तेथ पर्यंत तो थर होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर परमेश्वरापासून वाहिलेल्या वार्‍याने समुद्रावरून लावे आणले; ते छावणीवर व छावणीसभोवती इतके आले की, छावणीच्या मागे व पुढे एकेक दिवसाच्या अंतरापर्यंतच्या प्रदेशात त्यांचा सुमारे दोन हात उंचीचा थर जमला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेहकडून वारा वाहिला आणि समुद्रावरून लावे पक्षी आणले. आणि छावणीच्या सभोवती, एकंदर एकएक दिवसाच्या वाटेपर्यंत सर्व दिशेने सुमारे दोन हात उंचीचा थर पसरला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून दोन हात उंचीचा थर साचला. मनुष्य एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तिथपर्यंत तो थर होता.