Numbers 11:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोक तो गोळा करीत, तो उखळात कुटीत, किंवा भांड्यात शिजवीत किंवा दळीत व त्याच्या भाकरी करी. उत्तम तेलात भाजलेल्या गोड पुऱ्या सारखी त्याची चव लागे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक चोहीकडे फिरून तो गोळा करत. जात्यांत दळीत किंवा उखळांत कुटत आणि मग भांड्यांत शिजवून त्याच्या भाकरी करत; तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोक चोहीकडे जाऊन तो गोळा करीत असत आणि मग जात्यात दळीत किंवा उखळात कुटत असत. मग ते भांड्यात शिजवित किंवा त्याच्या भाकरी बनवित असत. त्याची चव जैतुनाच्या तेलात बनलेल्या भाकरीप्रमाणे असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोक तो चोहोकडे फिरून गोळा करीत. तो जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत, भांड्यात शिजवीत व त्याच्या भाकरी करीत. त्याची चव ताज्या जैतून तेलात तळलेल्या पुरीसारखी लागत असे.