Numbers 12:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ढग पवित्र निवास मंडपापासून वर गेला. तेव्हा अहरोनाने वळून मिर्यामकडे पाहिले. तिचे अंग बफर्ासारखे पांढरे झाले होते. तिला भयंकर त्वचेचा रोग झाला होता!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तंबूवरून मेघ निघून गेला तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली; अहरोनाने मिर्यामेकडे फिरून पाहिले तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मंडपावरून मेघ वरती घेतला गेला, तेव्हा मिर्यामची त्वचा रोगाने भरली होती; ती बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने तिच्याकडे वळून बघितले तेव्हा त्याने पाहिले की तिच्या त्वचेवर कोड फुटले होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ढग निवास मंडपापासून वर गेला. आणि मिर्याम अचानक बर्फासारखी पांढरी झाली होती. तेव्हा अहरोन मिर्यामकडे वळाला, त्याने पाहिले मिर्याम कोडी झाली.