Numbers 15:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा जर तुम्ही चूक केलीत आणि या आज्ञांचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल? जर इस्राएलच्या सर्व लोकांनी मिळून चूक केली तर त्यानी सर्वांनी मिळून एक गोऱ्हा परमेश्वराला होमार्पण केला पाहिजे. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. गोऱ्ह्याबरोबर धान्यार्पण आणि पेयार्पण करायला पाहिजे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण केला पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि मंडळीला नकळत ही चूक घडली असली, तर सर्व मंडळीने परमेश्वराला सुवास यावा म्हणून एका गोर्ह्याचे होमार्पण करावे; नियमानुसार त्याच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण करावे आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जर समुदाय जागृत नसताना हे नकळत घडले असेल, तर संपूर्ण समुदायाने एका तरुण गोर्ह्याचे याहवेहला सुवासिक होमार्पण करावे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण आणि पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा असे व्हावे की, मंडळीला नकळत जर तुम्ही पाप केले, तर सर्व मंडळीने मिळून परमेश्वरास सुवास म्हणून एक गोऱ्हा होमार्पण, नियमानुसार अन्नार्पण आणि पेयार्पण करावे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण करावा.