Numbers 15:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“म्हणून याजकाने लोकांना शुद्ध करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्याने या गोष्टी इस्राएलच्या सर्व लोकांसाठी केल्या पाहिजेत. ते पाप करीत आहेत हे लोकांना माहित नव्हते. पण जेव्हा ते त्यांना समजेल तेव्हा त्यांनी परमेश्वरासाठी भेट आणली. त्यांनी होमार्पण आणि पापार्पण आणले म्हणून लोकांना क्षमा केली जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग याजकाने इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्यांना क्षमा होईल; कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या ह्या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य आणि आपला पापबली परमेश्वरासमोर अर्पण केला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजकाने सर्व इस्राएली समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल; कारण त्यांनी मुद्दाम पाप केले नव्हते आणि त्यांनी याहवेहला आपल्या पापाबद्दल अन्नार्पण व पापार्पण सादर केले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून याजकाने इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याची क्षमा होईल. कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराकरता हव्य आणि आपला पापबलि परमेश्वरासमोर अर्पिला आहे.