Numbers 15:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“एखादा माणूस जेव्हा त्याची अर्पणे आणतो तेव्हा त्याने परमेश्वराला धान्यसुध्दा अर्पण केले पाहिजे. हे धान्यार्पण आठ कप सपीठ 1/4 हिंनभर तेलात मिसळून केलेले असले पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यज्ञ करणार्‍याने परमेश्वराप्रीत्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलीबरोबर किंवा यज्ञासाठी एक चतुर्थांश हिनभर तेलात मळलेल्या एक दशांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अर्पण आणणार्‍याने याहवेहसमोर एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळलेल्या बारीक सपिठाचा एका एफाचा दहावा भाग सादर करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी आपले अर्पण परमेश्वराकरता आणतो त्याने हिनाच्या एक चतुर्थाश तेलात मळलेले एफाचा एक दशांश सपिठ अन्नार्पण आणावे.