Numbers 16:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्ही तुझ्या मागे का यावे? तू आम्हाला चांगल्या गोष्टींनी समृद्ध असलेल्या नवीन प्रदेशात आणले नाहीस. देवाने कबूल केलेला प्रदेश तू आम्हाला दिला नाहीस. तू आम्हाला शेते व द्राक्षमळे दिले नाहीस तू ह्या लोकांना गुलाम करणार आहेस का? नाही. आम्ही येणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिवाय, दुधामधाचे प्रवाह वाहणार्या देशात तू आम्हांला मुळीच आणलेले नाहीस अथवा शेते व द्राक्षमळे ह्यांचे वतन आम्हांला दिलेले नाहीस. ह्या लोकांच्या डोळ्यांत तू धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या शिवाय, तू आम्हाला दूध व मध वाहणार्या देशात आणले नाहीस किंवा आम्हाला शेतीचे व द्राक्षमळ्यांचे वतन दिले नाहीस. या पुरुषांना तू गुलाम समजतोस काय? नाही, आम्ही येणार नाही!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणखी तू आम्हास दूध व मध वाहण्याच्या देशात आणले नाही आणि आम्हास शेताचे व द्राक्षमळ्याचे वतन दिले नाही. आता तू पोकळ वचने देऊन आमचे डोळे आंधळे करीत आहेस काय? आम्ही तुझ्याकडे येणार नाही.