Numbers 16:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून प्रत्येकाने भांडे आणले आणि त्यात उद धूप जाळला, नंतर ते दर्शन मंडपाच्या दारात उभे राहिले. मोशे आणि अहरोनसुद्धा तिथे उभे राहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्यांनी आपापले धुपाटणे आणून त्यात विस्तव ठेवला व त्यावर धूप घातला, आणि मोशे व अहरोन ह्यांच्याबरोबर ते दर्शनमंडपाच्या दाराजवळ उभे राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रमाणे प्रत्येकाने आपले धुपाटणे घेतले, त्यात जळते निखारे व धूप टाकला आणि ते मोशे आणि अहरोन यांच्याबरोबर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून प्रत्येकाने भांडे आणले आणि त्यामध्ये उद धूप जाळला, नंतर ते दर्शनमंडपाच्या दारात उभे राहिले. मोशे आणि अहरोनसुद्धा तिथे उभे राहिले.