Numbers 16:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते मोशे विरुद्ध बोलण्यासाठी समुहाने आले. ते लोक मोशेला आणि अहरोनला म्हणाले, “तुम्ही फारच अधिकार दाखवता आता पुरे झाले! इस्राएलचे इतर लोक ही पवित्र आहेत. त्यांच्यात अजूनही परमेश्वर राहतो. तुम्ही परमेश्वराच्या इतर लोकांपेक्षा स्वत:ला अधिक महत्वाचे समजत आहात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, “तुमचे आता फारच झाले! सबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्याठायी आहे; तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते एकजूट होऊन मोशे व अहरोन यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, “तुमचे आता फार झाले आहे! सर्व समुदाय व त्यातील प्रत्येकजण पवित्र आहे आणि याहवेह त्यांच्याबरोबर आहेत. मग तुम्ही स्वतःला याहवेहच्या मंडळीपेक्षा उच्च का मानता?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते मोशेविरूद्ध व अहरोनाविरूद्ध एकत्र समुहाने आले. ते त्यांना म्हणाले, “तुम्ही फारच अधिकार दाखवता आता पुरे झाले! इस्राएलाचे इतर लोकसुद्धा पवित्र आहेत. त्यांच्यात अजूनही परमेश्वर राहतो. तुम्ही परमेश्वराच्या इतर लोकांपेक्षा स्वत:ला अधिक महत्वाचे समजत आहात.”