Numbers 18:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, “तुला कुठलीही जमीन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांना मी वचन दिल्याप्रमाणे जमीन मिळेल. पण मी मात्र तुझी भेट आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “त्यांच्या जमिनीपैकी तुला काहीही वतन मिळणार नाही आणि त्यांच्यामध्ये तुला काही वाटाही मिळायचा नाही; इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने अहरोनाला म्हटले, “त्यांच्या देशात तुला वतन असणार नाही किंवा तुला त्यांच्यात कोणताही वाटा असणार नाही; इस्राएलमध्ये मी तुझा वाटा व तुझे वतन आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, तुला जमीनीपैकी काहीही वतन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे.