Numbers 18:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लेवीचे जे वंशज दर्शन मंडपात काम करतात ते त्याच्याविरुद्ध केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. मी इस्राएल लोकांना जी जमीन देण्याचे वचन दिले आहे ती जमीन लेवीना मिळणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर लेव्यांनीच दर्शनमंडपाची सेवा करावी; त्यांना लोकांच्या अन्यायाचा दोष वाहावा लागेल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये काही वतन नसावे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवी लोक सभामंडपामध्ये सेवा करतील आणि त्याविरोधात केलेल्या अपराधाची जबाबदारी ते स्वतः वाहतील. येणार्या पिढ्यांपर्यंत हा सर्वकाळचा नियम असेल. इस्राएलमध्ये त्यांना वतन मिळणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवीचे जे वंशज दर्शनमंडपामध्ये काम करतात ते त्याच्याविरुध्द केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये वतन नसावे.