Numbers 19:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वराने इस्राएल लोकांना जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. काहीही दोष नसलेली एक लाल गाय घ्या. त्या गायीला कसलीही इजा झालेली नसावी आणि त्या गायीने मानेवर कधीही जू घेतलेले नसावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा: इस्राएल लोकांना सांग की, निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवले नाही अशी एक तांबड्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने इस्राएल लोकांस जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवलेले नाही अशी एक लाल कालवड घ्या.