Numbers 19:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“नंतर जो माणूस शुद्ध असेल तो गायीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवील. शुद्ध होण्याचा जेव्हा लोक खास विधी करतात त्यावेळी त्यांना या राखेचा उपयोग करता येईल. एखाद्याचे पाप नाहीसे करण्यासाठी सुध्दा या राखेचा उपयोग करण्यात येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी; ही राख इस्राएल मंडळीच्या पापहरणार्थ अशौचक्षालनाचे (अशुद्धी दूर करण्याचे) पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“शुद्ध असलेल्या एका पुरुषाने कालवडीची राख गोळा करावी व छावणीबाहेर विधीनुसार शुद्ध असलेल्या ठिकाणी ठेवावी. ही राख इस्राएली समाजाने शुद्धीकरणाच्या पाण्यामध्ये वापरावी; ते पापक्षालनासाठी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर जो मनुष्य शुद्ध असेल तो कालवडीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवावी आणि ती इस्राएल वंशाच्या मंडळीकरता अशुद्धी दूर करण्याच्या पाण्यासाठी ती राखून ठेवावी, ती पापार्पण अशी आहे.