Numbers 2:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक दलाने आपल्या निशाणापाशी तळ दिला आणि प्रत्येक जण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते आपापली कुळे व आपापल्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्या अनुक्रमाने आपापल्या निशाणाजवळ डेरे ठोकत आणि कूच करीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशा रीतीने याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी प्रत्येक गोष्ट केली, ते असे की, आपआपल्या झेंड्याजवळ ते डेरे देत असत आणि आपले कूळ व घराणे यानुसार पुढे चालत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक कुळाने आपआपल्या निशाणापाशी तळ दिला. प्रत्येकजण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.