Numbers 22:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बलामने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, “मी माझ्या देवाची, परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे. मी त्याच्या आज्ञे विरुद्ध काहीही करु शकत नाही. परमेश्वराने सांगितल्या खेरीज मी कुठलीही लहान-मोठी गोष्ट करणार नाही. बालाकाने मला त्याचे सुंदर घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बलाम बालाकाच्या सेवकांना म्हणाला, “बालाकाने आपले घर भरून सोनेरुपे मला दिले तरी परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमीजास्त काहीएक करता येत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु बलामाने त्यांना उत्तर दिले, “बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बलामाने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमीजास्त काहीएक करता येत नाही. बालाकाने माझे घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही.