Numbers 22:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा बालाकाने बलामला पाहिले तेव्हा तो त्याला म्हणाला, “मी तुला आधीच यायला सांगितले होते. हे खूप खूप महत्त्वाचे आहे असे मी तुला सांगत होतो. तू माझ्याकडे का आला नाहीस? आता मी तुला कदाचित पैसे देऊ शकणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बालाक बलामाला म्हणाला, “मी तुला मोठ्या निकडीचे बोलावणे पाठवले होते ना? माझ्याकडे का नाही आलास? तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नाही काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बालाकाने बलामाला विचारले, “मी तुला तातडीचे बोलाविणे पाठवले नव्हते काय? तू माझ्याकडे का आला नाहीस? तुला बक्षीस देण्यास मी खरोखर समर्थ नाही काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा बालाकाने बलामास पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, मी तुला आधीच यायला सांगितले होते. तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नव्हतो काय?