Numbers 23:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव माणूस नाही. तो खोटे बोलणार नाही. देव म्हणजे काही माणूस नाही. त्याचे निर्णय बदलणार नाहीत. जर परमेश्वराने सांगितले की तो एखादी गोष्ट करील. तर तो ती करीलच. जर परमेश्वराने वचन दिले तर तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी, ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे. याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय? त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय?