Numbers 24:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलला आशीर्वाद द्यायची परमेशवराची इच्छा आहे हे बलामने पाहिले. म्हणून त्याने ते कुठल्याही प्रकारची जादू वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने वाळवंटाकडे पाहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसले असे जेव्हा बलामाने पाहिले तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकुन पाहायला गेला नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता जेव्हा बलामाने पाहिले की इस्राएलास आशीर्वाद देण्यास याहवेहला बरे वाटले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे मंत्रतंत्र करावयाला गेला नाही, तर त्याने रानाकडे आपले तोंड वळविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाला आशीर्वाद द्यायची परमेश्वराची इच्छा आहे हे बलामाने पाहिले. म्हणून त्याने ते कोणत्याही प्रकारचे मंत्रतंत्र वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने रानाकडे पाहिले.