Numbers 24:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्याकडे नेहमी भरपूर पाणी असेल. तुमचे बी वाढण्यासाठी लागणारे पाणी तुमच्याकडे भरपूर असेल. तुमचा राजा अगागच्या राजापेक्षा थोर असेल. तुमचे राज्य खूप महान असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या मोटेतून पाणी वाहील. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल; त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या पोहर्यातून पाणी वाहेल; त्यांच्या बिजांना भरपूर पाणी मिळेल. “त्यांचा राजा अगाग राजापेक्षा महान असेल; त्यांचे राज्य गौरवित केले जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाणी त्यांच्या बादलीतून वाहील, आणि त्यांच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्यांचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्यांच्या राजाचा गौरव होईल.