Numbers 26:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अलीयाबचे मुलगे नमुवेल, दाथान व अबीराम. हे दाथान व अबीराम मंडळीतले निवडक पुरुष होते. कोरहाच्या टोळीने परमेश्वराला विरोध केला तेव्हा ह्यांनी त्या टोळीत सामील होऊन मोशे व अहरोन ह्यांना विरोध केला होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.