Numbers 27:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याची सगळी मिळकत घरातल्या सगव्व्यात जवळच्या नातेवाईकाला मिळावी.”‘ इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेशवराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला चुलते नसले तर त्याच्या कुळापैकी सर्वांत जवळचा जो नातलग असेल त्याला ते वतन द्यावे, म्हणजे तो ते भोगील.”’ परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांसाठी हा विधी व निर्णय समजावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर त्याच्या पित्याला भाऊ नसले, तर त्याचे वतन त्याच्या कुळातील जवळच्या नातेवाईकाला द्यावे, म्हणजे ते त्याचे वतन होईल. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांस हा न्यायाचा नियम असावा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याचे वतन त्याच्या कुळापैकी जो सर्वात जवळचा नातेवाईक असेल त्यास ते मिळावे. इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.