Numbers 27:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर यहोशवाला काही निर्णय घ्यायचे असतील तर तो याजक एलाजारकडे जाईल. एलाजार उरीमचा उपयोग करुन परमेशवराचे उत्तर माहीत करुन घेईल. नंतर यहोशवा आणि इस्राएलचे सर्व लोक देवाच्या सांगण्याप्रमाणे करतील. जर तो म्हणेल की, ‘युद्ध करा,’ तर ते युद्ध करतील. आणि त्याने सांगितले की ‘घरी जा’, तर ते घरी जातील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील; यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्यासहित सर्व इस्राएल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो एलाजार याजकापुढे उभा राहील, तो त्याच्यावतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वरास विचारील. त्याने व त्याच्याबरोबर इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व आत यावे.