Numbers 27:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“सलाफहादच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या भावांना मिळणाऱ्या जमिनीत त्यांचाही वाटा असायला पाहिजे. म्हणून त्यांच्या वडिलांना जी जमीन मिळाली असती ती त्यांना दे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“सलाफहादाच्या मुली बोलतात ते बरोबर आहे; त्यांच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर तू त्यांना अवश्य वतनभाग द्यावा; त्यांच्या बापाचा वाटा त्यांच्या नावे कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सलाफहादाच्या कन्या जे म्हणतात ते बरोबर आहे. तू खचितच त्यांना त्यांच्या पित्याच्या नातेवाईकामध्ये त्यांचा वाटा म्हणून द्यावे आणि त्यांच्या पित्याचे वतन त्यांना दे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सलाफहादाच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांबरोबर त्यांना मिळणाऱ्या वतनात त्यांचाही वाटा द्यावा. म्हणून त्यांच्या वडिलांचे वतन त्यांच्या नावे कर.