Numbers 28:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“शब्बाथच्या वेळी तुम्ही एक वर्षाच्या दोन मेंढ्या दिल्या पाहिजेत. त्या दोषरहित असाव्यात. तुम्ही 16 कप पीठ हीन तेलात मिसळून केलेले धान्याचे अर्पण आणि पेयाचे अर्पणही दिले पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दर शब्बाथ दिवशी एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरचे पेयार्पण ही अर्पावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“शब्बाथ दिवशी एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, व त्याबरोबर पेयार्पण व जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे दोन दशांश बारीक पीठ धान्यार्पण असे अर्पण करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“प्रत्येक शब्बाथ दिवशी एक एक वर्षाचे दोन निर्दोष नर कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरची पेयार्पण ही अर्पावी.