Numbers 32:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशे त्यांना म्हणाला, “गाद आणि रऊबेनचे लोक यार्देन नदी पार करतील. ते लढाईत परमेश्वराच्या पुढे चालतील. ते तुम्हाला प्रदेश जिंकायला मदत करतील आणि तुम्ही गिलादचा प्रदेश त्यांच्या वाटेचा भाग म्हणून द्याल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशे त्यांना म्हणाला, “जर गादाच्या व रऊबेनाच्या वंशजांतील प्रत्येक पुरुष सशस्त्र होऊन तुमच्याबरोबर परमेश्वरापुढे यार्देनेपलीकडे गेला व देश तुमच्या ताब्यात आला, तर तुम्ही त्यांना गिलाद प्रदेश वतन करून द्यावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे त्यांना म्हणाला, “जर गाद आणि रऊबेन गोत्राचे लोक, त्यांच्यातील प्रत्येक पुरुष जो युद्धासाठी हत्यारबंद झालेला, याहवेहसमोर तुमच्याबरोबर यार्देन पार करतील, जेव्हा तुमच्यापुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही गिलआदाचा प्रांत त्यांना त्यांचे वतन म्हणून द्यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे त्यांना म्हणाला, गाद आणि रऊबेनचे लोक यार्देन नदी पार करतील. ते लढाईत परमेश्वराच्यापुढे चालतील. ते तुम्हास प्रदेश जिंकायला मदत करतील आणि तुम्ही गिलादाचा प्रदेश त्यांच्या वाटेचा भाग म्हणून द्याल.