Numbers 33:54 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीचा काही भाग मिळेल. तुम्ही चिठ्ठया टाकून कोणाला कुठली जमीन मिळते ते ठरवाल. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. चिठ्यां कुठल्या कुळाला कुठली जमीन मिळाली ते कळेल. प्रत्येक कुळाला त्याचा स्वत:चा जमिनीचा तुकडा मिळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही तो देश चिठ्ठ्या टाकून आपापल्या कुळांप्रमाणे वाटून घ्यावा; मोठ्या वंशाला मोठा भाग द्यावा आणि लहान वंशाला लहान भाग द्यावा; एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल; आपापल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हांला वतन मिळावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या कुळानुसार चिठ्ठ्या टाकून जमीन वाटप करावी. संख्येने मोठ्या असलेल्या गटाला मोठे वतन व लहान गटाला लहान वतन. चिठ्ठीद्वारे जे निघेल ते त्यांचे वतन होईल. तुमच्या पूर्वजांच्या गोत्रानुसार त्याची वाटणी करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्ठ्या टाकून देश वतन करून घ्या. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपआपल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हास वतन मिळेल.