Numbers 34:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करुन ती त्सीन वाळवंटातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून तुमची सरहद्द अक्रब्बीम चढावाच्या दक्षिणेस पोचून तेथून वळून त्सीनापर्यंत असावी, आणि ती तशीच कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस जावी, आणि हसर-अद्दारापर्यंत जाऊन असमोनास पोचावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथून तुमची सीमा अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस पोचून तिथून ती पुढे सीन पर्यंत जाऊन कादेश-बरनेआच्या दक्षिणेपर्यंत आणि हाजार अद्दारपर्यंत जाऊन आजमोनास पोचावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करून ती त्सीन रानातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल.