Numbers 35:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एखाद्या माणसाने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो माणूस त्याच्या स्वत:च्या प्रदेशात जाऊ शकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्यवध करणार्याने शरणपुरातच राहायचे होते; पण मुख्य याजक मेल्यावर पाहिजे तर त्याने आपल्या वतनात परत जावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण आरोपीने त्या आश्रयाच्या नगरात महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत राहिले पाहिजे; महायाजकाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्या मनुष्याने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो मनुष्य त्याच्या स्वत:च्या प्रदेशात जाऊ शकतो.