Numbers 35:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलच्या मोठ्या कुटुंबांना जमिनीचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान कुळांना लहान तुकडे मिळतील. म्हणून मोठी कुळे जास्त शहरे आणि लहान कुळे थोडी शहरे लेवींना देतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांच्या वतनातून जी नगरे लेव्यांना द्यायची ती मोठ्या वतनातून अधिक व लहान वतनातून कमी अशी द्यावीत; प्रत्येक वंशाने आपापल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावीत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवी लोकांना जी नगरे तुम्ही द्याल ती इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राला मिळालेल्या वतनाच्या प्रमाणात: म्हणजे ज्यांना पुष्कळ नगरे मिळाली त्यांच्याकडून पुष्कळ, परंतु ज्यांना थोडी नगरे मिळाली त्यांच्याकडून थोडी नगरे घेऊन द्यावीत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाच्या मोठ्या कुटुंबांना वतनाचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान वतनातून कमी अशी द्यावीत. प्रत्येक वंशाने आपआपल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावी.