Numbers 4:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पवित्रनिवासमंडप व वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराजा पडदा, सर्व तणावे व त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, हे सर्व सामान गेर्षोनी कुळांनी वहावे; आणि ह्या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निवासमंडप आणि वेदी ह्यांच्यासभोवती असलेल्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या फाटकाचे पडदे व तणावे आणि त्यांच्या सेवेला लागणारी उपकरणे, हे सर्व सामान त्यांनी वाहावे; आणि ह्या सामानासंबंधाने जे काही काम पडेल ते सर्व त्यांनी करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, दोर्या आणि मंडपातील सेवा करण्यासाठी वापरलेली सर्व उपकरणे. या संबंधीच्या ज्यागोष्टी करण्याची गरज आहे, त्या गेर्षोनी लोकांनी कराव्यात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
निवासमंडप व वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा, सर्व तणावे व त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, या सर्व वस्तू गेर्षोनी कुळांनी वहाव्यात; आणि या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे.