Numbers 5:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सुचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; ‘तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरुद्ध पाप करुन दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग ह्या अतिशय पीडा देणाऱ्या पवित्र पाण्यापासून तुला काही अपाय होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे, कोणा पुरुषाने तुझ्याशी कुकर्म केलेले नसले आणि तू आपल्या पतीला सोडून दुसर्‍याकडे जाऊन भ्रष्ट झालेली नसलीस, तर तू ह्या शापजनक कटू जलाच्या परिणामापासून मुक्त राहा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे, “जर कोणी पुरुषाने तुझ्याशी लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत आणि तू आपल्या पतीशी विवाहित असताना निर्दोष असून वाकडे पाऊल टाकले नाही, तर या कडू पाण्यापासून मिळणारा शाप तुला अपाय न करो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सूचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरूद्ध पाप करून दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग या शाप देणाऱ्या कडू पाण्यापासून मुक्त हो.